Mozilla

आमचं काम वेबवर खुलेपणा, कल्पकता व संधींना प्रोत्साहन देण्याचे आहे.

Mozillaमध्ये, आम्ही विचारवंतांचा, तंत्रज्ञांचा, व बिल्डर्सचा एक जागतिक समुदाय आहोत जे इंटरनेट जीवंत आणि खुलं राहाण्यासाठी एकत्र काम करत आहेत, जेणेकरुन जगभरात जाणकार स्वयंसेवी व वेबचे जनक असतील. आम्हला विश्वास आहे की ह्या खुल्या व्यासपीठावर मानवी सहभाग हा वैयक्तिक वाढ व आपल्या एकत्रित भविष्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

आमच्या कार्यात पुढे जाण्यासाठी ज्या मुल्यांचे व तत्त्वांचे मार्गदर्शन आम्हाला मिळते त्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी Mozilla जाहीरनामा वाचा.

आम्ही कोण आहोत, कुठून आलोत आणि आम्ही तुमच्यासाठी वेब चांगलं कसं बनवत आहोत हे जाणून घेण्यासाठी हा विडीओ बघा.